Yor are here : Home»  News »
Print

Scholarship Schemes for Students

ही माहिती विद्याथ्याचे भविष्य बदलू शकते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या
सर्वच उच्च शिक्षणासाठी दोनशेपेक्षा जास्त शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत; परंतु माहितीअभावी विद्यार्थी या सर्व योजनांपासून वंचित आहेत. ग्रामीण परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण न करता सोडून देतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती मिळाल्यास त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल.

नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट योजना
सदर योजनेकरिता इयत्ता 2 री ते 5 वी, 6 वी ते 10 वी; तसेच वर्ग 11 वीत 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता नासा आणि नॅशनल स्पेस सोसायटी (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्ज जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात करावा. अधिक माहितीकरिता 9175518074 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

इन्स्पायर फेलोशिप
सदर योजना विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारद्वारे देण्यात येते. डॉक्‍टरेट संशोधनासाठी (10 वी 60 टक्केपेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी) एक हजार विद्यार्थिनींना पाच वर्षांकरिता इन्स्पायर फेलोशिप देण्यात येते. सदर योजनेकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.

महात्मा गांधी स्कॉलरशिप
सदर योजना लंडन मेट्रोपोलिटन युनिव्हर्सिटीद्वारे देण्यात येते. 12 वीनंतर पदवी, पदव्युत्तर पदवी / सर्वांसाठी देण्यात येते. एक हजार पौंड आणि मोफत शिक्षण; तसेच शिक्षणखर्चात 50 टक्के सूट देण्यात येते. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत. अधिक माहितीकरिता 8180030185 या हेल्पलाईनवर संपर्क करावा.

मौलाना आझाद नॅशनल स्कॉलरशिप योजना
सदर योजना मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन, अल्पसंख्याक, मंत्रालय, भारत सरकारद्वारे देण्यात येते. इयत्ता 11 वीला प्रवेशित विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करावा. शिक्षणाचा संपूर्ण खर्च, पुस्तके, स्टेशनरी, राहणे, जेवणाचा खर्च हा शिष्यवृत्तीमधून करण्यात येतो.

पॅनासोनिक स्कॉलरशिप
पॅनासोनिकद्वारे मिळणारी शिष्यवृत्ती फक्त जपानमध्ये मास्टर व रिसर्च प्रोग्रामकरिता देण्यात येते. एन्ट्रन्स फी असिस्टंट 2,50,000 येन देण्यात येते व ट्युशन असिस्टंट 2,50,000 येन प्रति सहामाहीत व रिसर्चकरिता बेसिक स्कॉलरशिप 1,50,000 येन प्रतिमाह व ट्युशन असिस्टंट 2,00,000 येन प्रति सहामाही शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर योजनेकरिता फेब्रुवारी व मार्च महिन्यात अर्ज करावा. योजनेविषयी अधिक माहितीकरिता 9273663032 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

इंडियन स्कॉलर स्कॉलरशिप टेस्ट
सदर योजना मानवसेवा विकास फाऊंडेशनकडून वर्षातून दोन वेळा देण्यात येते. इंजिनिअरिंग, मेडिकल, बीसीए, सर्व बीएस्सी, 11 वी, 12 वी विज्ञान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 20,000 रु. शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रवेशाचा कालावधी नोव्हेंबर व डिसेंबर; तसेच परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. तसेच परीक्षा-2 करिता मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करावा. तसेच परीक्षा नोव्हेंबर महिन्यात मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद इ. परीक्षा केंद्रांवर घेण्यात येते. 200 गुणांची बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात येते. गुणवत्तेनुसार प्रत्येकी 20,000 रु. शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. सविस्तर माहितीकरिता व प्रवेश अर्जाकरिता www.manavsevaindia.com या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा 9273663032 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

के. सी. महिंद्रा एज्युकेशनल ट्रस्ट शिष्यवृत्ती (परदेशातील शिक्षणासाठी) सदर योजना के. सी. महिंद्रा एज्युकेशनल ट्रस्टकडून देण्यात येते. पदवीधर विद्यार्थ्यांना 95,000 रु. शिष्यवृत्ती देण्यात येते. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (गुणवंतांना आधार)
सदर योजनेकरिता समाजकल्याण विभागात चौकशी करावी. अनुसूचित जातीमधील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

एन.डी.ए.मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
1. परशुरामभाऊ पटवर्धन शिष्यवृत्तीमध्ये दरमहा 350 ते 500 रुपये देण्यात येतात.
2. कर्नल केंडल फ्रेंक मेमोरियल शिष्यवृत्ती वार्षिक 360 रुपये देण्यात येतात.
3. अल्बर्ट एक्का शिष्यवृत्ती 350 रुपये देण्यात येतात.
4. एफ. जी. ऑफिसर डी. व्ही. पिंटू मेमोरियल शिष्यवृत्ती दरमहा 225 रुपये देण्यात येतात.
5. पायलट ऑफिसर गुरमित सिंग बेदी मेमोरियल शिष्यवृत्ती 420 रुपये देण्यात येतात.
6. वित्तीय सहाय्य 50 टक्के खर्च प्रशिक्षण काळासाठी देण्यात येतात.
अपंगांसाठी शिष्यवृत्ती 10,000 रुपये.
सदर योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारा पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र, 10 वी, 12 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. योजनेसंदर्भात सविस्तर माहितीकरिता 9175276019 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

आय.आय.टी. बॉम्बे स्कॉलरशिप
सदर योजना आय.आय.टी. कॉलेजद्वारे देण्यात येते. आय.आय.टी. बॉम्बे कॉलेजमध्ये पदवीधर व 5 वर्षांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत व 300 रुपये देण्यात येतात.

अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती
सदर शिष्यवृत्तीकरिता पदवी, पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक तांत्रिक शिक्षणासाठी देण्यात येते. या योजनेंतर्गत 30,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप
के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टकडून देण्यात येणाऱ्या सदर योजनेकरिता 10 वी, 12 वी 60 टक्के व तंत्रनिकेतनला प्रवेशित विद्यार्थी अर्ज करू शकतात. दरमहा 5000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर शिष्यवृत्ती तंत्रनिकेतनच्या तीन वर्षांकरिता मिळते. निवड 10 वी व 12 वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार करण्यात येते. योजनेविषयी अधिक माहितीकरिता 9273663032 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
सदर परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीक्षा, नवी दिल्लीद्वारे आयोजित करण्यात येते. इयत्ता 8 वीचे विद्यार्थी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करू शकतात. परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येते. दरमहा 500 (वर्ग 9 वी ते 12 वीपर्यंत) तसेच पदवीकरिता 6000 रुपये देण्यात येतात. अधिक माहितीकरिता 8180030185 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा
ही शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी 9 वी, 10 वीच्या विद्यार्थ्यांना नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणेद्वारा देण्यात येते. प्रवेश अर्ज मे, जून, जुलै महिन्यात भरावा. राज्यस्तरावर 750 रुपये, जिल्हास्तरीय 300 रुपये, उत्तेजनार्थ 5 बक्षिसे, विशेष पारितोषिक 3000 रु., 2000 रु. 1500 रु. निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावे.

जवाहर नवोदय परीक्षा
जवाहर नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी करिता देण्यात येते. जुलै, ऑगस्ट, महिन्यात अर्ज करावा. परीक्षेद्वारे निवड करण्यात येते. 5 वीनंतरचे शिक्षण, निवास, भोजन, पुस्तके, शिक्षण साहित्य आणि गणवेष विनामूल्य देण्यात येते.

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना
मातंग समाजाच्या 10 पोटजातीमधील 10 वी, 12 वी, पदविका, अभियांत्रिकी, वैद्यकीय परीक्षेत 60 टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. सदर योजना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाद्वारे देण्यात येते. प्रवेशाचा कालावधी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करावे. 10 वी - 1,000, 12 वी - 1,500, पदविका - 2,000 रु., अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरिता भरपूर शिष्यवृत्ती देण्यात येते.

आदिवासी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सदर योजनेकरिता विद्यार्थी इयत्ता 8 वी ते 12 वी शिक्षण घेत असलेले;तसेच अनुसूचित जमातीचे अपंग विद्यार्थी अर्ज करू शकतात. एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्फे ही शिष्यवृत्ती देण्यात येते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अर्ज करावा. शिष्यवृत्ती रु. 500 प्रतिमाह; तसेच वाहन भत्ता 100 रु. प्रतिमहा देण्यात येतो.

उद्यान शालिनी फेलोशिप प्रोग्राम (फक्त मुलींसाठी)
इयत्ता 10 वीमध्ये 60 टक्के पास विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्ज जून, जुलै महिन्यात करावा. शिक्षणाचा संपूर्ण खर्च देण्यात येतो.

एस. के. पाटील लोन स्कॉलरशिप (विदेशात शिक्षणाकरिता)
सदर शिष्यवृत्ती इंजिनिअरिंग, टेक्‍नॉलॉजी, मेडिकल इ. उच्च शिक्षणाकरिता, शिक्षणाचा संपूर्ण खर्च देण्यात येतो. फक्त विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकरिता ती देण्यात येते.

इंडियन ऑईल ऍकॅडमिक स्कॉलरशिप योजना
सदर योजना इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून दिली जाते. या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी इयत्ता 10 वी पास व आयटीआय असावा. तसेच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांकरिता इंजिनिअरिंग एम.बी.बी.एस. व पदवीनंतर एमबीएकरिता ही शिष्यवृत्ती देण्यात येते. दहावी आणि आयटीआयच्या दोन हजार विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरिता एक हजार रुपये महिना दिले जातात; तर इंजिनिअररिंगच्या 300 विद्यार्थ्यांना चार वर्षांकरिता तीन हजार रुपये महिना दिले जातात आणि एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांकरिता शंभर विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये महिना देण्यात येतात. सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 65 टक्के गुण असावे. एस. सी., ओबीसी व मुलींकरिता 60 टक्के गुण असावेत. अपंग विद्यार्थ्यांकरिता 50 टक्के गुण आवश्‍यक आहेत. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे नसून गुणवत्ता यादीनुसार होईल. म्हणजेच या शिष्यवृत्तीकरिता परीक्षा किंवा मुलाखत नाही. या शिष्यवृत्तीकरिता जास्तीत जास्त अर्ज करावेत. अधिक माहितीकरिता स्कॉलरशिप इन्फॉर्मेशन सेंटरच्या 9273663032 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.